प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दिनांक चार ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. येवेळी नायब तहसीलदार वडवाळकर मॅडम, मंडळ अधिकारी एस यम आरगडे, ग्राम महसूल अधिकारी मुक्ता गोटे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कऱ्हाळे, संभाजी कऱ्हाळे, रूपाजी कऱ्हाळे, कवी शिवाजीराव कऱ्हाळे, डॉक्टर संगीता टार्फे, कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार वडावळकर मॅडम यांनी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महसूल विभागाच्या मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड किसान क्रेडिट कार्ड, सातबारा अंतर्गत उतारे फेरफार नक्कल श्रावण बाळ योजना निराधार योजना यासंदर्भात सुद्धा ग्रामस्थांना उपयुक्त अशी माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन साखरे, विठ्ठल खोंडे, संतोष कोरडे, युवराज कऱ्हाळे अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस आशा वर्कर तसेच महसूल विभाग तसेच ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.