April 20, 2026 9:43 am

हिंगोलीच्या सौ. दीपाली डुब्बेवार ह्यांना राज्यस्तरीय मखर स्पर्धेचे पारितोषिक

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली, आर्य वैश्य समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने निर्मित स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची संकल्पना मांडून आर्य वैश्य समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या कल्याणासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ च्या रूपात साकारास आणणाऱ्या आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र व ह्या अंतर्गत असलेल्या आर्य महिला आघाडी महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय महालक्ष्मी मखर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, पुसद, हदगाव, तामसा, हिंगोली, उमरी, उदगीर, देगलूर, नांदेड, मुखेड, वसमत, परभणी, शेलू, धर्माबाद, कंधार, परळी वैजनाथ, किल्ले धारूर, माजलगांव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई या भागातील, एकूणच राज्यातील ज्या-ज्या भागात आर्य वैश्य समाज आहे, त्या भागातील समाज भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

तथाकथित सेक्युलरवादाला बळी पडून आपल्या प्रथा, परंपरा, धार्मिक विधी पासून दूर चाललेल्या युवा पिढीला [प्रामुख्याने युवतींना] त्यांच्या बघण्याच्या, विचार करण्याच्या दृष्टीने आपल्या प्रथेचे, परंपरेचे, धार्मिक विधींचे महत्व पटवून सांगण्याच्या विचारातून, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अशी माहिती संघर्ष समितीचे प्रमुख आधारस्तंभ ब्रम्हानंद चक्करवार ह्यांनी व्हिडिओ कॉफ्रसिंग द्वारे देऊन विजेत्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धक भगिनींसाठी संघर्ष समितीचे सचिव ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार यांच्या वतीने एक ग्राम सोन्याचे नाणे सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा, सोन्याची श्री बालाजीची प्रतिमा, पैठणी साड्या, सेमी पैठणी साड्या, बनारसी साड्या, लक्ष्मी-श्री गणेशाच्या चांदीच्या प्रतिमा असे पारतोषिक ठेवण्यात आले होते. स्पर्धेत भाग घेतलेल्या राज्यभरातील स्पर्धक भगिनींना पारितोषिक वितरणाचे कार्य सध्या संघर्ष समितीचे पदाधिकारी गावोगाव जाऊन करत आहेत अशी माहिती हिंगोली येथे बक्षीस वितरणासाठी आलेल्या समिती उपाध्यक्ष बालाजी पांपटवार ह्यांनी दिली.

आर्य वैश्य समाजातील हिंगोली येथील ज्येष्ठ पत्रकार व शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते डॉ.विजय निलावार आणि महासभा जिल्हाध्यक्ष श्री. गिरीष गुंडेवार यांच्या हस्ते हिंगोली येथील स्पर्धक भगिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले.ह्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेत हिंगोली येथील समाज भगिनी सौ. दीपाली अभिजात डूब्बेवार ह्यांनी सुंदर, भक्तीभावपूर्ण मखर सजावट करत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने त्यांना सोन्याची श्री बालाजीची प्रतिमा डॉ. विजय निलावार, महासभा जिल्हाध्यक्ष श्री. गिरीश गुंडेवार,बालाजी पांपटवार ह्यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच आर्य वैश्य समाजाचा आध्यात्मिक वारसा असलेल्या वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज यांची प्रतिमा देवून त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेत भाग घेत छान मखर सजावट केल्याबद्दल सौ. शलाका गुंडेवार, सौ. निकिता व्यवहारे, सौ. सुजाता गुंडेवार, सौ. वर्षा बिडवई यांना ही ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, गिरीष भाऊ गुंडेवार, बालाजी पांपटवार ह्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले

यावेळी हिगोली महासभा सचिव आनंद निल्लावार, कोषाध्यक्ष ॲड अशोक डुब्बेवार, राजकुमारजी गुंडेवार,डॉ.गोपाल महाजन,अभिजात उर्फ गामू डुब्बेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या प्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधव-भगिनींनी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या कार्याचे तोंडभरून कौतुक करत संघर्ष समितीचे पदाधिकारी म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात समिती उपाध्यक्ष बालाजी पांपटवार ह्यांचा डॉ.विजय निलावार गिरीश गुंडेवार ह्यांच्या हस्ते सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आर्यावैश्य समाजाच्या या प्रेमाबद्दल संघर्ष समिती सदैव समाजाच्या ऋणात राहून समाजातील तळागळातल्या समाजबांधवांच्या कल्याणासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील असा संदेश समितीचे संस्थापक ब्रम्हानंद चक्करवार ह्यांनी व्हिडिओ कॉन्फरिंग द्वारे दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें