April 20, 2026 12:48 am

पानकनेरगाव येथील आंदोलकांनी मिळवलेल्या गायरान जमीनवर सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्यामुळे गावकऱ्यात नाराजीचा सूर

पानकनेरगाव येथील आंदोलकांनी मिळवलेल्या गायरान जमीनवर सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्यामुळे गावकऱ्यात नाराजीचा सूर

अतिक्रम धारकांच्या दाढेतली जमीन काढली अन प्रसासनाने आंदोलकांना विश्वासात न घेता परस्पर जमीन बळकावली

*हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे*

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव मागील अनेक वर्षापासून ग्रामस्थानी आपल्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने शस्त्र उचलले आणि तीन वर्षे लढा दिला गायरान मधील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून वन्य प्राण्यांसाठी जमीन मोकळी केली मात्र शासनाने आंदोलकाच्या कष्टांना मिळालेले फळ या संधीचा उपयोग घेऊन मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केला आहे म्हणजे शासनाचा मूख्यमंत्री सौर ऊर्जा प्लॅन म्हणजे आयत्या बिळावर नागोबा म्हणावा लागेल

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव हद्दीत ऐकून ७ ते ८ गट क्रमांक मधील जवळपास ३०८ एकर गायरान जमीन आहे. गायरान जमीन पूर्वी शासनाने वन्य प्राणी व तसेच गूरचणासाठी राखीव ठेवलेली आहे या गायरानमधे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी बांधव शेकडो वर्षापासून गुरे ढोरे चरण्यासाठी या गायरान जमीनीचा वापर करत आले व तसेच रोही, हरण, वानर, डूकर, वन्य प्राणी जंगल वस्तीचा सहारा सूद्धा घेत होते पानकनेरगाव परिसर हा दुर्गम भाग ओळखला जातो या दूर्गम भागात वन्य प्राण्याचा जास्त प्रमाणात वावर असतो सदर मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून गायरान जमिनीवर काही लोकांनी महसूल व ग्रामपंचायतच्या डोळ्यात धूळफेक करत गायरान असलेल्या जंगल वस्तीतील उभ्या झाडाची खुले आम कत्तल करून बेकायदेशीररित्या गायरानवर कब्जा केला होता जंगल वस्तीतील वृक्षतोड झाल्यामुळे वन्य प्राणी मालकीच्या शेताकडे वळले आणि कवळ्या पिकाची नासधूस करून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान करायला लागले सदरील वन्य प्राण्यांच्या हक्काची जागा मिळावी म्हणून शेतकरी बांधवांनी बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या तिन वर्षापासून शेतकरी

प्रशासनाच्या पायरी झिजवत आहे कागदोपत्री पत्रव्यवहार करून समाधान कारक न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने संवैधानीक मार्गाने रास्ता रोको आंदोलन, उषोषण मोर्चा, असे शेकडो आंदोलने करण्यात आली. सदर मात्र संबंधित प्रशासनाकडून अजूनपर्यंत समाधानकारक न्याय मिळाला नाही असे असले तरी मात्र काही प्रमाणात आंदोलकांच्या पदरात यश मिळाले आणि आज रोजी तिनशे एकरच्या जवळपास आंदोलकांनी अतिक्रमण मुक्त करून गूरे ढोरे व वन्य प्राण्यांच्या हक्काची जमीन मिळवून दिली सदर असे असतानाच आंदोलकांना झोपेत दगड मारून गायरान बळकावल्याचा प्रकार उघड दिसत आहे व तसेच गावकरी आणि शेतकरी बांधवांना विश्वासात न घेता शासनाने परस्पर गायरान जमिनीमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारून परस्पर जमीन हडपण्याचा डाव सुरू केला आहे १५ हेक्टर मध्ये एवढा मोठा प्रकल्प गावात होत आहे मग जनता व आंदोलकांना विश्वासात न घेता प्रकल्प उभारला कसा जातो का ग्रामपंचायत आणि प्रशासनासोबत मिळता जुळता व्यवहार झाला की काय अशी

चर्चा सूद्धा गावकऱ्यांमध्ये आहे

या प्रकल्पाचा फायदा गावाला कितपत योग्य होईल माहित नाही परंतु आज रोजी आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे

*प्रतिक्रिया*

तहसील कार्यालयातून २५/१/२३/ रोजी ग्रामपंचायतला आलेल्या पत्राचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले त्यानुसार सौर ऊर्जा प प्रकल्पासाठी ठराव मागितला होता त्याअनुषंगाने ग्रामसभेने ग्रामपंचायतला येणारी दिवाबत्तीचे बिल व पाणी पुरवठा योजनेचे बिल माफी करण्यात यावी या दोन अटी व शर्तीवर ठराव मान्य करण्यात आला होता. परंतु अजून पर्यंत वरिष्ठ कार्यालयातून ग्रामपंचायत तिला वरील अटी व शर्ती मान्य आहेत की नाही याचे कूठलेच उतर न मिळाल्यामुळे सौर ऊर्जेचे काम बंद करण्यात यावे. अशी नोटीस देण्यात आली आहे.

*सरपंच सौ अर्चना शेख देशमुख*

*प्रतिक्रिया*

पानकनेरगाव परिसर हा दुर्गम भाग ओळखला जातो या दुर्गम भागात वन्य प्राण्यांचा जास्त प्रमाणात वावर आहे येथील शेतकऱ्याचं वन्य प्राण्यांमुळे अतोनात नुकसान होत आहे वन्य प्राण्यांची हक्काची जंगल वस्ती गायरान जमीन मिळावी म्हणून गावकऱ्यांनी अनेक आंदोलन उपोषण करत मेहनतीने गायरान जमीन मिळवली ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी ने मात्र ग्रामसभा न घेता व तसेच जनतेला विश्वासात व कुठलीच कल्पना न देता परस्पर ठराव मंजूर कसा केला कोणत्या अटी शर्तीवर जमीन दिली आणि या प्रकल्पाचा फायदा कितपत योग्य आहे हे जनतेसमोर जाहीर करावे असे प्रतिपादन शामराव देशमुख यांनी दिली

*शामराव देशमुख शेतकरी*

*प्रतिक्रिया*

गायरान शेजारील माझी स्वतःची मालकीची जमीन आहे यामधील पूर्वी वन्यप्राणी या जंगल वस्तीचा सहारा घ्यायचे काही लोकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर कब्जा केला होता वन्य प्राण्यांना जमीन मिळावी म्हणून आम्ही आंदोलन करून गायरान जमीनवरील अतिक्रमण मोकळे केले परंतु शासनाचा आयत्या बिळात नागोबा आमच्या व वन्य प्राण्यांचे हक्काची जमीन बळकावली

*अशोक गुंजकर आंदोलक*

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें