April 20, 2026 5:23 am

सातव महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शालेय साहित्य वाटप..

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

मागील काही दिवसांपुर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले होते.विशेषत: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली.यामुळे ग्रामीण व शहरी भागातील शेती,घरे, गुरेढोरे यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

कळमनुरी तालुक्यात सुद्धा या पर्जन्यवृष्टी ने नुकसान झाले आहे.

अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती बघावयास मिळाली.

यामध्ये वरील नुकसानी बरोबरच शालेय विद्यार्थ्यांना ही झळ पोहचली.शालेय साहित्याचेही नुकसान झाले.याच गंभीर परिस्थितीचा विचार करून कै.डॉ.शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपण काही तरी मदत केली पाहिजे असा प्रस्ताव कर्मचारी वर्गा समोर ठेवला.या मदतीच्या प्रस्तावास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तात्काळ होकार दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक गाव शिवणी (खुर्द) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मदत करायचे ठरले.लगेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नगदी राशी जमा करून शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या व पेन या शालेय साहित्याची खरेदी केली.

शनिवार दिनांक ११ रोजी हे शालेय साहित्य शाळेत जाऊन

सरपंच साहेबराव जाधव पोलिस पाटील सौमित्रा सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता गाभणे, लोकरे मॅडम

यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रमोद इंगोले यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शिंदे, डॉ.आर.एस.मुसळे, डॉ.रमाकांत कस्तुरे, डॉ.प्रमोद इंगोले,

डॉ.सौ.सुरेखा शिंदे, डॉ.शिवाजी वायभासे,प्रा.के.एच.वाघमारे, डॉ.डी.के.खोकले, डॉ.डी.बी.केंद्रे, डॉ.मारोती भोसले श्री.विजय पाटील,श्री.अशोक जटाळे, श्री.कौशिक जटाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें