April 20, 2026 9:32 am

डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे दोन तास रास्ता रोको

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे डिग्रस कऱ्हाळे

डिग्रस कऱ्हाळे (फाटा) – तात्काळ संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ व हेक्टरी ५० हजार रुपये द्या आणि इतर मागण्यासाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे (फाटा) येथे मंगळवार (दि.७) सकाळी शेतकरी डॉ. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ओला दुष्काळ जाहीर करावा, कयाधू नदी भूमिगत चोरून नेण्याचे रद्द करा, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी करून सरकार विरोधात घोषणाबाजी देवून परिसर दणाणून सोडला होता. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामध्ये डॉ. रमेश शिंदे, सुरेशआप्पा सराफ, माधवराव कोरडे, गजानन कावरखे, एकनाथराव शिंदे,नामदेव पतंगे, एकनाथ वाबळे,राजू पतंगे, माधवराव कोरडे , उमराव पाटील, एकनाथराव शिंदे, दत्तराव नवघरे, नानाराव बाबुराव लोणसने, बालाजी मस्के ,गजानन कावरखे ,गजानन माने,गंगाधर साखरे, मोहनराव कऱ्हाळे, ज्ञानोबा कऱ्हाळे, शेषराव राखुंडे,पांडुरंग जाधव, ग्यानबा सावंत, बंडू कऱ्हाळे, उमराव कऱ्हाळे, प्रल्हाद कऱ्हाळे, भारत कऱ्हाळे, सायबराव कऱ्हाळे, भिंमराव शेळके, पांडु जामटकर,अतिश महाजन, विष्णू कऱ्हाळे, संतोष कऱ्हाळे, अनिल शेळके, मंगेश शिंदे, शिवाजी शिंदे, परमेश्वर कऱ्हाळे,महेश क-हाळे जगन क-हाळे निवृत्ती कऱ्हाळे, अशोक कऱ्हाळे, गजानन कऱ्हाळे, शाम कऱ्हाळे, समाधान सिरसागर,भागवत कऱ्हाळे, आशोक कऱ्हाळे, काशिनाथ झिपरगे,बबनराव सावळे,गजानन माने, सिताराम माने, प्रकाश माने, सोपान वाव्हळ,यांच्यासह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन चालले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. रमेश शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें