April 20, 2026 1:28 am

न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे वाल्मीकी जयंती साजरी

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू मॉडल डिग्री कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची ‘आश्विन पौर्णिमा’ या तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अमोल अवचार यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. सुनिल हजारे, डॉ. पवन वासनिक, डॉ. अतिश कदम, डॉ. संभाजी चौतमाल, डॉ. आर. डी. कोल्हे, प्रा. सुभाष मापारी, प्रा. सुनिल पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. किरवले, प्रा. शिर्के, प्रा. कोकाटे, डॉ. के. एल. पुरी, प्रा. व्ही. आर. चव्हाण, प्रा. रजत सातपुते, श्री. देवगिरीकर, श्री. भाटी तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. राजेंद्र केदारे, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. कैलास बांगर, श्री. अल्लाउद्दीन पठाण, विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें