April 20, 2026 6:02 am

*विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे आर्थिक साक्षरता अभियानाच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन*

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली जिल्ह्यातील कोळसा : येथे आयोजित “आर्थिक साक्षरता अभियान” हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या अभियानात विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा चे अध्यक्ष श्री. भास्करराव बेंगाळ साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.प्रदीप गुडसूकर सर लातुर,गोपाळ वाडीकर सर, संस्थेचे सचिव श्री.अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य श्री.अभिषेक भैय्या बेंगाळ, मुख्याद्यापक श्री शिंदे आर.बी.,श्री सरकटे व्ही.एस., पर्यवेक्षक श्री कसाब पी.पी.,मान्यवरांचा सहभाग होता. अभियानात कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आर्थिक बाबींची माहिती देण्यात आली व आर्थिक व्यवहार कसे करावेत याचे मार्गदर्शन करण्यात आले.या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे व त्यांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती देणे हा होता. अभियानात विविध स्तरांवर उपक्रम राबवण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध आर्थिक योजनांची माहिती मिळाली आहे. तसेच आर्थिक व्यवहार करताना विद्यार्थ्यां मध्ये असलेली भीती व अनिश्चितता कमी होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक, विमा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीने केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अभियानामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत जागृती निर्माण होणार आहे. तसेच नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

तसेच आज देश शिक्षणाच्या बाबतीत साक्षर झाला पण आर्थिक साक्षर होणे सुद्धा गरजेचे आहे.आपण मोबाईल द्वारे, बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करतो बाजारामध्ये अनेक शेअर बाजार कंपनी आल्या आहेत. तरी आपण हा आर्थिक व्यवहार समजदार पनाने करणे आवश्यक आहे. सर्व बाबींची व्यवस्थीत माहिती घेऊनच आपण व्यवहार करणे आवश्यक आहे.असे प्रदीप गुडसूकर साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें