April 20, 2026 9:43 am

पुसेगाव आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली दिं15 रोजी हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेहमीप्रमाणे नियमित लसीकरण न होण्यामुळे महिलांना व बालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या निष्काळजीपणा विरोधात आज ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन केले या आंदोलनास मा.श्री. गजाननराव पोहकर पाटील (मा.सभापती पंचायत समिती सेनगाव तथा भावी जिल्हा परिषद सदस्य पुसेगाव) यांनी हजेरी लावून ग्रामस्थांच्या भावनांना पाठिंबा दिला. या वेळी गावातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने तातडीने लसीकरण सेवा नियमित सुरू करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें