April 20, 2026 1:30 am

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची 94 वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रा. सुभाष मापारी, प्रा. सुनिल पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. गौरव गोरे, प्रा. किरवले, प्रा. कोकाटे, डॉ. लक्ष्मी गलंडे, प्रा. अलका करंडे, डॉ. वाय. एम. काशिदे, डॉ. के. एल. पुरी, प्रा. विजय कांबळे, प्रा. अमोल अवचार, प्रा. मधुकर लेमले, प्रा. सुभाष चव्हाण, प्रा. गोपाल जाधव, प्रा. रजत सातपुते, प्रा. एस. एस. काशिदे, प्रा. श्याम खर्जुले, तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. राजेंद्र केदारे, श्री. किरण लोडे, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. शेरु, विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें