April 20, 2026 1:13 am

मोप शिवारात जिल्हा मासिक चर्चासत्र संपन्न. 

प्रतिनिधि सुधारक ढुकरे कनेरगाव ना.

कनेरगाव नाका:– महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील शेतामध्ये प्रत्येक महिन्याला कृषी विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या जिल्हा मासिक चर्चासत्रानुसार आज दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 रोज गुरुवारला हिंगोली तालुक्यातील मोप येथील त्रंबक भानुदास धाबे व मधुकर रामजी भोसले यांच्या शेतात जाऊन मासिक चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पिकांवरील रोग, शेताची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची, फवारणी कशाप्रकारे करायची, पिकांची काळजी कशी घ्यायची, उपाययोजना काय करायच्या, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या चर्चा सत्राला हिंगोली जिल्ह्यातील प्रसन्न हजारे कृषी संचालक हिंगोली, डॉ. गजानन गडदे शास्त्रज्ञ, शिव संदीप रणखांब तालुका कृषी अधिकारी, गणेश पवार मंडळ अधिकारी, संग्राम जाधव जिल्हा कृषी अधिकारी, उल्हास राठोड उप कृषी अधिकारी ,कमलाकर सांगळे मंडळ अधिकारी, तसेच कळमनुरी, नरसी नामदेव, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली, कनेरगाव नाका येथील सर्व जिल्हा व तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी उत्तम साठे ,विनय शिंदे, माधव गोरे, विजय पवार, देवानंद उंदरे , प्रशांत व्यवहारे , पिरालालजी राठोड, गणेश दहात्रे उपसरपंच ,बालाजी भोसले, रामेश्वर बर्वे, सखाराम मुधोळकर, चंद्रशेखर भोसले, विलास पानपटे ,संतोष बर्वे, आदी करून शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला योग्यरित्या पार पाडण्यासाठी गजानन पतंगे व गणेश दहात्रे यांनी मेहनत घेतली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें