प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव ना.
कनेरगाव नाका :- हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे प्रवासी वर्गाकरिता बसण्यासाठी जागा नाही , कनेरगाव येथून वाशिमकडे व हिंगोली कडे जाणारे प्रवासी मुख्य रस्त्यावर उन्हात उभे राहून बसची वाट पाहत असतात . पोलीस चौकीच्या बाजूला हिंगोली कडे जाण्यासाठी तर वाशिम कडे जाण्यासाठी प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते . अशामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारे मध्येच गाड्या उभ्या करतात त्यामुळे प्रवाशांना बस पकडायला अडचण होत आहे . पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कार्यवाही करीत नाहीत . या ठिकाणी बस स्टॉप आहे त्या ठिकाणी खाजगी प्रवासी वाहतूक उभी करतात , त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे . शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणा करता वाशिम -हिंगोली कडे जात असतात त्यांना सुद्धा बसमध्ये चढण्याकरिता या खाजगी वाहनांना ओलांडून बस कडे जावे लागते .कनेरगाव नाका येथून हिंगोली , अकोला परभणी, नांदेड, अमरावती नागपूर, संभाजीनगर जिंतूर, रिसोड या मार्गे गाड्या जात असतात त्या गाड्या पकडण्याकरिता प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून खाजगी वाहनांना ओलांडून त्रास सहन करून गाडी पकडावी लागते . तसेच कनेरगाव नाका हे बाजारपेठेचे गाव असून येथे प्रवाशांना लघु शंकेकरीता मुत्रीघर व शौचालय नाही अशावेळी प्रवाशांना लांब दूर जावे लागते . तसेच महिलांना या गोष्टीला तोंड द्यावे लागत आहे .लघु शंका तसेच बस व अवैध वाहतूक या तिघांचा ताळमेळ साधून आम्हाला सुख सुविधा उत्पन्न करून द्याव्यात अशी अपेक्षा प्रवासी पोलीस प्रशासन , ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करत आहेत .













