प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव ना.
मराठवाडा व विदर्भ सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर असलेली पोलीस चौकी निजाम सरकारच्या काळापासून कार्यरत आहे परभणी जिल्हा असतानाही पोलीस चौकी नेहमी कार्यरत असून या ठिकाणी पूर्वी दोन-तीन कर्मचारी वास्तव्यात राहायचे त्यानंतर हिंगोली जिल्हा झाला गोरेगाव पोलीस स्टेशन मिळाले पोलीस त्यावेळी सुद्धा पोलीस कर्मचारी व एक पीएसआय नेहमी करता हजर राहायचे परंतु आता गेल्या एक वर्षापासून पोलीस चौकी ही बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे या पोलीस चौकीच्या अंतर्गत 40 गाव येतात परंतु या चौकीत पाच सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असताना दोन कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीच हजर राहत नाही काही तंटा किंवा भानगडी उद्भवल्यास कोणाला तक्रार द्यायची असली तर बासंबा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा लागतो रात्रीच्या वेळी फक्त पेट्रोलिंग ची गाडी एक-दोन वेळेस चकरा मारून जाते काही काम असल्यास कर्मचारी येतात व जातात परंतु या ठिकाणी कोणीच राहायला तयार नाही गावामध्ये अवैद्य धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे पोलीस फक्त स्वतःच्या कमाई करता काहीच करत नाही कोणतीही कार्यवाही नाही आवेद्य वाहनावर कोणतीच कारवाई केल्या जात नाही मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी फळ विक्रेते व हातगाड्यावरील चहापाणी नाश्त्याचे गाडी रस्त्याच्या जवळ कडेला लागून उभी केल्या जातात त्या गाड्या समोर अनेक नागरिकांच्या दुचाकी वाहन उभे केल्या जातात दुचाकी वाहनामुळे रस्त्यावर रहदारीला येणाऱ्या जाणाऱ्यांना व वाहनांना अडथळा निर्माण होतो याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे हिंगोली जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या पोलीस चौकीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष दिसून येत आहे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक इकडे लक्ष देतील का अशी ग्रामस्थातून चर्चा होत असताना दिसून येत आहे पोलीस अधीक्षकांनी व ठाणेदारांनी चौकीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना चौकीला नियमित थांबण्यासाठी नियम घालावे पूर्वी चौकीला दूरध्वनी व वायरलेस होते परंतु आता पोलीस चौकीमध्ये काहीच नाही. पोलीस चौकी बंद असताना मोकाट कुत्रे ,मोकाट जनावरे , डुकर येऊन बसतात पोलीस चौकी नेहमीच बंद असते काम असले तर कर्मचारी येतात नाहीतर बाहेर कोठे धाब्यावर किंवा एखाद्याच्या दुकानावर बसतात असे दिसून येते













