प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साळवा, केंद्र – डोंगरगाव पूल तालुका – कळमनुरी येथे नवरात्र निमित्त माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या माता पालक मेळाव्यास इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक उपस्थित होत्या. या मेळाव्यात साळवा येथील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सुप्रिया दापके यांनी माता पालक गटाचे महत्व, विद्यार्थ्यांचे अभ्यास गट, या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद चा विद्यार्थी टिकण्यासाठी करावयाचे प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटात माता पालकांचे सहकार्य याबाबत प्रबोधन केले. दिगंबर जाधव सरांनी माता पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यास विषयक जागरूक व्हावे असे सांगितले.
माता पालक अध्यक्ष रुख्मिनाताई माखणे यांनी आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी सर्व मातांनी जागरूक व्हावे असे आवाहन केले. सुपरवायझर विजयमाला पाईकराव यांनी विद्यार्थ्यांच्या माता व शिक्षकच विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतात असे सांगितले. तसेच सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी शाळेतील शाळेतील उत्तम चित्रकार असलेला नैतिक कैलास पाईकराव याच्या तील कलागुणांना वाव देण्यासाठी त्याला ड्रॉइंग किट भेट दिली.तसेच फोले सर अंभोरे सर, साईनाथ पाटील सर, चापोले सर यांनी माता पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केले. यानंतर महिलांचा दांडिया उपक्रम घेण्यात आला.शिवकिरण लांडगे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ततेसाठी सतीश कदम यांनी अथक परिश्रम घेतले. धुसे पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले.













