April 20, 2026 9:43 am

आजारसोंडा गावात जलजीवन मिशन निधीबाबत संशय; ग्रामस्थांचा RTI अर्ज

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आजारसोंडा गावात जलजीवन मिशन अंतर्गत आलेल्या कोट्यवधी निधीच्या वापराबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांनी या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली (RTI) चौकशीची मागणी करत अर्ज दाखल केला आहे.

30 सप्टेंबर 2025 रोजी अर्जदार राजेश तुकाराम आहेर यांनी पंचायत समिती औंढा (ना) येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल केला. यात 2018 ते 2025 या कालावधीत मंजूर झालेला निधी, प्रत्यक्षात झालेला खर्च आणि पूर्ण झालेल्या कामांची सविस्तर माहिती मागण्यात आली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रत्यक्ष जमिनीवर योजना अपूर्ण असून पाणीपुरवठा सुरळीत नाही. शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण हिशोब पारदर्शकपणे मांडावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें