प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली दिं 6 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथे सुसज्ज आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र भूमिपूजन हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले.
कडोळी येथे आयुष्यमान आरोग्यमंदिर उपकेंद्राचे भूमिपूजन झाल्याने कडोळी येथील ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त होत होते. यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हा प्रश्न सोडवल्याबद्दल कडोळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर मंडळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.













