April 19, 2026 8:56 pm

हिंगोली येथे होणार साहित्य जगतचे ४ थे राज्यस्तरीय साहित्य संमेलन

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली,’साहित्य जगत’ मासिकाच्यावतीने आयोजित चौथे राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगोली येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते होणार असून कलानंद जाधव (जेष्ठ कवी व लेखक, हिंगोली) हे संमेलनाध्यक्ष राहतील. डॉ. संजय नाकाडे (सुप्रसिद्ध डॉक्टर, हिंगोली) हे स्वागताध्यक्ष असतील तर , गोडाती काळे (कवी, कथाकार) हे कार्यवाह म्हणून उपस्थित राहतील. संमेलनाचे प्रास्ताविक साहित्य जगत मासिकाचे साहित्य संपादक व व्यवस्थापक भगवान राईतकर करतील.

संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने होईल. या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी साहित्यिक, वारकरी व वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच इतर नागरिक सहभागी होतील. त्यानंतर सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र होणार असून यामध्ये माजी नगराध्यक्ष मा. दिलीपराव चव्हाण जेष्ठ साहित्यिक भ.मा.परसवाळे, जेष्ठ कवी प्रा. विलास वैद्य, जेष्ठ कादंबरीकार अशोक अर्धापुरकर, मावळते संमेलनाध्यक्ष रामदास राजेगांवकर,माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, ज्ञानदेव मानवतकर व साहित्य जगतच्या मुख्य संपादिका सौ. गीता भगवान राईतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत “संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अभंगातील सामाजिक प्रबोधन” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. याचे अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मंगनाळे (हिंगोली) हे आहेत तर सौ. अर्चना पौळ (परभणी) व प्रा. रामदास धोंडगे (मेहकर) हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. सौ.सुमन दुबे, हिंगोली त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दुपारी १.३० वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. या कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व पत्रकार श्री नागेश कांगणे (मेहकर) हे राहतील. ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण ( बुलढाणा) , प्रा. अशोक सारडा, सौ.सुवर्णा मुळजकर ( परभणी) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सत्रात महाराष्ट्रातील ३० हून अधिक मान्यवर कवी-कवयित्रींचा सहभाग राहणार आहे. अशी माहिती संमेलनाचे कार्यवाह गोडाती काळे यांनी दिली.

संमेलनाचे आयोजन साहित्य जगत परिवार हिंगोली शाखा , भगवान राईतकर साहित्य मित्र मंडळ (महाराष्ट्र राज्य), दैनिक अभिव्यक्ती सामर्थ्य परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें