April 19, 2026 9:06 pm

शिवसेना ठाकरे गटाचे विजवीतरण कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली – जिल्ह्यात डिजिटल बोगस मिटर बसविणाऱ्या कंपन्यावर कारवाई करून तातडीने बसविण्यात आलेले मिटर तातडीने बदलन्यासाठी सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाने विजवीतरण कार्यालया समोर ढोल बजाओ आंदोलन करून निवेदन दिले.

विजवीतरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात विविध कंपन्या मार्फत शासनाचा कोणताही जिआर नसताना कंपन्या मनमानी कारभार करून डिजिटल मिटर बसविन्याचे काम सुरु केले आहे. बसविण्यात आलेले मिटर हे बोगस असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या असून यामुळे आव्वाच्या सव्वा विज बिल येत असल्याने नागरिक ही वैतागून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक होत असल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे या कंपन्याना काळ्या यादीत टाकण्यात यावे असे नमूद केले आहे.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, वसीम देशमुख, डॉ. जुनेद देशमुख, संतोष देवकर, गणेश देशमुख, आनंदराव जगताप, पराग अडकीने, शंकर घुगे, अलीम खतीब, भानदास जाधव, गणेश गावंडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें