हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
हिंगोली :जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग आठ असले तरी शिक्षक मात्र तीनच आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे तरी कसे ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनी केला आहे. याबाबत शिक्षण विभागाला शालेय शिक्षण समितीच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे समितीच्या शिक्षण विभागाने तत्काळ शिक्षक उपलब्ध करून द्या वे ? असा प्रश्नही पालकांनी शिक्षण विभागाला केला आहे. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराचा फटका तालुक्यातील शिक्षक कमी झाल्याने पालकांना आपल्या पाल्यांचे कसे होईल? ही चिंता लागली आहे. काही पाल्यांनी आपल्या मुलाच्या टी.सी. काढून जिल्ह्याच्या ठिकाणी टाकल्या आहेत. मात्र, आता अनेक विद्यार्थी जिल्हा शाळांना बसत आहे. हिवरखेडा येथे जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाळा आहे. मात्र, येथे आठ वर्ग आणि तीन शिक्षक आहेत. हिवरखेडा येथे जिल्हा परिषद शाळा असून, शाळेत सुमारे 90 विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या शाळेत परिषद शाळेतच शिक्षण घेत आहेत शिक्षण विभागला नवीन शिक्षकांची मागणी केली आहे. परंतु अजूनही शिक्षण विभागाकडे लक्ष दिल नाही. शिक्षक द्या म्हणून मागण केली आहे.
*शिक्षण विभागाने तात्काळ शिक्षक द्यावेत*.
हिवरखेडा येथे आठवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र, येथे तीनच शिक्षक राहिले आहेत. शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र, अद्यापही या ठिकाणी दुसरे शिक्षक आले नाहीत. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. येत्या आठ दिवसांत शिक्षण विभागाने दखल घ्यावी. नसता सीईओ यांच्या दालनासमोर आंदोलन केले जाईल.
*नाथराव डाखूरे, शालेय समिती अध्यक्ष, हिवरखेडा*













