प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे ते सावळी तांडा या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
डिग्रस ते सावळी रस्त्यादरम्यान सावळी शिवारामध्ये जो ओढा आहे त्या ओढ्यामधील रस्त्यावरच फार मोठाले खड्डे झाल्याने याओढ्यातून चार चाकी वाहन सुद्धा नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
डिग्रस ते सावळी या रस्त्यावर ये जा करणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत त्या खड्ड्यांमध्ये अनेक वेळा दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
डिग्रस ते सावळी या रस्त्यावरून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिद्धनाथ महादेव देवस्थान गांगलवाडी येथे याच रस्त्यावरून जावे लागते.
दत्त जयंती निमित्त गांगलवाडी येथे लाखो भाविक भक्त याच रस्त्यावर येतात, पण रस्ता खराब झाल्याने येणाऱ्या भावी भक्तांची फार मोठी गैरसोय होत आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधी व शासनाने या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी सावळी डिग्रस गांगलवाडी या ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्याचे काम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते.













