नवयुवक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीची कार्यकारिणी..

सुधाकर डुकरे कनेरगाव प्रतिनिधी.

कनेरगाव नाका:- हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील नवयुवक सार्वजनिक दुर्गा मंडळ समितीची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नुकतीच निवड करण्यात आली, यामध्ये विकासकुमार शेठी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, यावेळी उपाध्यक्ष मधुकर गणपत गावंडे ,सचिव रामकिसन महाले, सदस्य अशोकराव राऊत, रामेश्वर गावंडे, रामचंद्र गावंडे, भिकुलाल बियानी, नारायण सावकार राऊत, आदी मंडळी उपस्थित होते, यावर्षी दुर्गा महोत्सवामध्ये विविध सामाजिक- धार्मिक कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले, दरवर्षी गावातील नवतरुण देवीसाठी ज्योत आणण्याचे काम करतात, त्यांनी गेली चार वर्षांमध्ये साडेतीन शक्तीपीठामधून ज्योत आणून देवीसमोर नऊ दिवस अहोरात्र ज्योत पेटवण्याचे काम केले.. या महोत्सवाला सर्व कनेरगाव नाका व परिसर उपस्थित असतो. एक गाव एक दुर्गादेवी असे हे कनेरगाव नाका गाव आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें