April 20, 2026 6:16 am

दोन शेतकरी महिलांचा बुडन मृत्यू

प्रतिनिधी प्रल्हाद चव्हाण वसमत

तालुक्यातील गुंडा येथील दोन शेतकरी महिला शुक्रवार दि.12 रोजी हळद निंदणीसाठी शेतात गेल्या होत्या.

गुरुवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारी साडेचार च्या सुमारास त्या घराकडे निघाल्या, पण वाटत असलेल्या थुना नदीच्या ओड्या ला पाणी आले होते. या ओढ्यात गयाबाई अंबादास सारोळे वय वर्ष साठ, व सखुबाई विश्वनाथ भालेराव वय वर्ष 55, यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या वाहून गेल्या. शुक्रवारी रात्रीपर्यंत गावातील ग्रामस्थांनी शोधकारी हाती घेतले होते. शनिवारी सकाळी त्यांचे मृतदेह घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर पुण्यामध्ये असलेल्या गाळामध्ये मिळून आले आहे. गयाबाईंच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली तर सखुबाईंच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें