प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव (ना)
कनेरगाव नाका:- हिंगोली तालुक्यातील मराठवाडा -विदर्भ सीमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी बासंबा पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने भेट देऊन मुला -मुलींच्या समस्यां समजून त्यांना योग्य ती माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच त्यांचे मार्गदर्शन केले. दामिनी पथक मधील श्रीमती आरती साळवे मॅडम यांनी गुड टच -बॅड टच, बालविवाह, बालविवाह प्रतिबंधक कायदा, वाहन चालवताना चे नियम, हेल्पलाइन नंबर 112, 1098 बद्दल संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी उपस्थित असलेले श्री यस. यस. जमादार (पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन बासंबा) यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कांचन एल भिसे, जया श्रीरंग पाटोळे( महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन बासंबा) वी. व्ही. मारवाडी (पोलीस अंमलदार) पोलीस स्टेशन बासंबा,जी.यस. कदम (होमगार्ड), यस.के.मोगले (होमगार्ड )संगीता इंगोले यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाला सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.













