ज्ञानेशप्रसाद पोधाडे वाशिम प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्नित, श्री गजानन बाल रुग्णालय मालेगांव व जनता गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अभियान शुक्रवार रोजी जनता गणेश मंडळ तेली वेटाळ मालेगांव येथे मोफत बालरोग निदान व औषध वाटप शिबीर संपन्न झाले. मालेगांव येथील तेली वेटाळ, येथे 55 वर्षापूर्वी तेली समाज, जनता गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. असून, सुरुवातीपासूनच तेली समाज जनता गणेश मंडळातर्फे दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे यावर्षी देखील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तेली समाज जनता गणेश मंडळ मालेगांव येथे मोफत बालरोग निदान व औषध वाटप आणि आयुष्यमान कार्ड शिबीर यशस्वीपणे राबविण्यात आले. यामध्ये 59 लहान मुलांची मोफत तपासणी व औषधी वाटप करण्यात आली. या शिबिरामध्ये श्री गजानन बाल रुग्णालयाचे संचालक बालरोगतज्ज्ञ डॉ. देवळे व सहकारी डॉ ओंकार शेटे, गजानन कुटे व आरोग्य मित्र गणेश जाधव तसेच तेली समाज जनता गणेश मंडळाचे सन्माननीय विश्वस्तांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.













