April 20, 2026 5:52 am

वाशिम: पोलीस दलाचा DJ संदर्भात महत्त्वाचा संदेश

ज्ञानेशप्रसाद पोधाडे वाशिम प्रतिनिधी

वाशिम: जिल्हा पोलीस दला तर्फे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील गणेशोत्सवा दरम्यान पारंपारिक टाळ मृदंग आणि ढोल यांच्या गगनभेदी गजरामध्ये साजरा करत असतो परंतु अलीकडच्या काळामध्ये या पारंपरिक वाद्यांची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जागा ही डीजे सारख्या कर्कश अशा मोठ मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम ने घेतली असून, यावर थीरकरताना युवा पिढी पिढीतील तरुणांना अत्यंत उत्साह येत असला तरी, या प्रचंड कर्ण कर्कश आवाजामुळे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये अनेक वृद्ध हे वेगवेगळे आजाराने ग्रस्त असतात आणि त्याचा त्रास या आजारी व्यक्तीला होत असतो. कुणाला हृदयाशी संबंधित आजारी व्यक्तीला अशा डीजेच्या आवाजाचा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो. तर लहान बालकांना या आवाजामुळे बधिरता येते, अनेकांच्या घरांमध्ये नुकतीच लहान बालके जन्माला आली असतात तर, आठ/दहा वर्षाची बालके तर आपल्याला गल्लोगल्ली बघायला मिळतात. या बाल वयात कानाचे पडदे हे वयानुसार तितकेच कोवळे असल्याने त्यांच्या कानावर त्याचा परिणाम होतो. याची पुसटशी कल्पना मात्र या उत्साही युवकांना नसते त्यांचा तसा उद्देश नसतो परंतु DJ चे दुष्परिणाम लक्षात घेतले तर, नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचविणारे DJ साऊंड सिस्टीम ही गणेशोत्सवातील गणेश मंडळांनी टाळावी. हा महत्त्वाचा संदेश वाशिम जिल्हा पोलीस दलाने एका पथनाट्यद्वारे रिसोड येथे अष्टभुजा देवी जवळ घेतलेल्या स्टेज शोमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे दिला. या पथनाट्याचा मध्ये सात पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रात्यक्षिकांमध्ये जे वृद्ध व्यक्ती डीजेच्या आवाजाने कोसळतात ते गणेश मंडळातील एका सदस्याचे वडील असतात असा संदेश या पथनाट्याद्वारे पोलीस दलाने दिला. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाचे उपस्थित नागरिकांनी विशेषतः महिलांनी कौतुक केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें