C.M.यांचे उपसचिव अमोलदादांची गणेश मं.ला स्नेहभेट

ज्ञानेशप्रसाद पोधाडे वाशिम प्रतिनिधी

वाशिम: दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वा. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे उपसचिव पदी निवड झाली आहे. अमोलदादा पाटणकर, हे वाशिम जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, तेली समाजाचे भूषण होत. अमोलभाऊंनी श्री जनता गणेश मंडळ मालेगाव येथे स्नेहभेट दिली असता, मंडळा तर्फे अमोल भाऊ पाटणकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. सानिका ज्ञानेश्वर काटेकर ताईंनी अमोल भाऊंचे औक्षण केले, त्यानंतर जनता गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, अमोल पाटणकर यांचा यथोचित सन्मान केला. त्यानंतर तेली समाजाची अग्रणी संस्था, आम्ही तेली जय संताजी फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेशप्रसाद यांनी देखील संघटनेच्या वतीने अमोलदादा पाटणकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने अभिनंदन केले. श्री गणरायाच्या साक्षीने, तेली समाजातील गणमान्य व्यक्तीं सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती अमोल पाटणकर यांनी श्री गणरायाची महाआरती केली. व माझ्या तेली समाजाला शक्य तितक्या लवकर यशोशिखर गाठू दे! अशी मनोभावे प्रार्थना लंबोदर वरदविनायका कडे केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें