हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
परभणी :-देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाले नुकताच स्वातंत्र्य दिन सलग तीन दिवस मोठा गाजावाजा करून झगमगाटात साजरा झाला . पण गेली अनेक पंचवार्षीक निवडणुकीत वाघाळा-फुलारवाडी हा साडेतीन किमी अंतराचा रस्ता नुसता नेत्यांच्या अश्वासना पुरता राहुन गेला आहे. या वेळी जिल्ह्याच्या भुमीपुत्र असलेल्या ना. मेघनाताई बोर्डीकर दिदींना पालकमंत्री पद मिळाल्याने वाघाळा-फुलारवाडी- अदिवासी पारधी वस्तीवरील नागरीकांना हा रस्ता होईल अशी शेवटची अपेक्षा वाटत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाले परंतु अजून ही फुलारवाडी गावात राज्य परिवहन मंडळाची लालपरी पोहचली नाही. बाभळगाव कडून फुलारवाडी साठी रस्ता होऊन हा मार्ग अरुंद आणि धोकादायक वळणांचा असल्याने लालपरी,अवजड वाहन जाण्या योग्य नसल्याचे सांगितले जाते.
वाघाळा-फुलारवाडी या रस्त्याचे माती काम आणि मजबुती करण १९९४ साली वाघाळा गावचे तत्कालीन सरपंच कै नागोराव घुंबरे यांच्या पुढाकारातून झाले होते.अनेक अडचनी वर मात करत हा रस्ता त्यांनी वाघाळा गावापासून फुलारवाडी पर्यंत नेला. परंतु त्या नंतर या रस्त्याच्या मजबुती करण,डांबरी करणा साठी नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासनावर दोन्ही गावच्या नागरीकांची बोळवन केली आहे.
या ठिकाणचा हा रस्ता शालेय विद्यार्थ्यी,शेतकरी आणि आदिवासी पारधी वस्ती वरिल नागरीकां साठी अतिषय महत्वाचा आहे. या ठिकाणाहुन पावसाळ्यात आजारी नागरीक दवाखाण्यात पोहचण्या आगोदरच मयत झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत तर गरोदर महिलांची प्रसुती रस्त्यात झाल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या असून माध्यमां मध्ये ठळक पणे लिहून आल्या नंतर सात्वंन भेटी देऊन नेत्यांनी केवळ आजपर्यंत आश्वासनांवर बोळवन केली आहे.
फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्तीवरील नागरीक बाजार हटासाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि प प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि विजेच्या कामा साठी ३३ केव्ही विज उपकेंद्रात सतत येत असतात मात्र पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता पुर्णत:चिखलमय होत असल्याने जेष्ठ नागरीक आणि शाळेला नियमित येणा-या चिमुकल्या मुला,मुलींना प्रचंड त्रास सहन करत दर दिवशी पायपिट करत मजल दरमजल करत या रस्त्याने चिखलातून प्रवास करावा लागत आहे. सोबतच या दोन्ही गावचे हे शिवार पाणीदार असल्याने पावसाळ्यात शेतकरी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवार पाणीदार असून ही खत,औषधी,मशागत करणे होत नसल्याने उत्पादन ही अपेक्षित भेटत नाही.
नेते मात्र कधी हा रस्ता सा. बां. विभागा कडे वर्ग करतात तर कधी जि प बांधकाम विभागा कडे सोईने वर्ग केल्याचे सांगुन निधी मिळऊन आणतोच अशा आश्वासनावर प्रत्येक वेळी वेळ मारून नेतात मात्र निधी काही टाकत नसल्याचे नागरीक सांगतात.
सद्य स्थितीत वाघाळा-फुलारवाडी हा रस्ता जि प बांधकाम विभागा कडे असल्याचे सांगितले जाते. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकी मध्ये किमान पन्नास पन्नास लाखाचा निधी दिला तरी तीन चार टप्यात हे काम पुर्ण होऊन फुलारवाडी करांचे लालपरिचे स्वप्न जिल्ह्याच्या भुमीपुत्र असलेल्या पालमंत्री दिदी स्वातंत्र्याच्या ७९ वर्षा नंतर पुर्ण करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा रस्ता जर सार्वजनिक बांधकाम विभागा कडे वर्ग केला तर एकाच वेळी पुर्ण रस्त्याचे काम होऊ शकते असे जाणकार सांगतात. आता अनेक वर्षा नंतर दिदींना दिर्घ काळा साठी मंत्रीपद मिळाले आहे,त्यांच्या बेधडक कामगिरी मुळे भविष्यात लवकरच दिदींना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल तेव्हा दिदींनी गरोदर महिला,आजारी व्यक्ती, जेष्ठ नागरीक, शाळेला येणारी लहान लहान मुलं,मुली,शेतकरी यांची या चिखलमय रस्त्या वरुन पाई,बैलगाडी ने प्रवास करताना होणारी कुचंबना दुर करवी अशी मागणी वाघाळा ,फुलारवाडी आणि आदिवासी पारधी वस्तीवरील नागरीकां कडून होत आहे.













