April 19, 2026 9:09 pm

देशी दारूचे बाॅक्स घरपोहस्त वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने घेतले ताब्यात

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे

*दमदार कामगिरीमुळे राजूदास जाधव पोलीस कर्मचार्याच गाव व जिल्हा स्तरातून होते कौतुक*

हिंगोली :सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस सज्जनाचे रक्षण करण्यास आणि दूर्जनावर नियंत्रण ठेवून त्याचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत तसे असले तरी खरं म्हणजे पोलीस प्रशासन म्हटलं की नागरिकाच्या मनात पहिले हप्तेखोर हा प्रश्न उभा राहतो प्रत्येकाच्या मनात भ्रम आहे अवैध धंद्यावर पोलिसांचा आशीर्वाद आहे का हप्ते घेऊन चालतात का असा प्रत्येक नागरिकांच्या मनात भरम निर्माण झाला परंतु पोलीस दलातील काहीच पोलीस हप्तेखोर असून काही पोलीस निस्वार्थी कर्तव्यदक्ष काम बजावतात याचे उदाहरण १७ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईतून सेनगाव पोलिसांनी. पुन्हा एकदा आपल्या कारवाईतून दाखवून दिले

सेनगाव तालुक्यात पानकनेरगाव हे लोकसंख्या असलेल्या मोठं गाव आहे येथील सर्व समाजाचे लोक राहतात; परंतु हे गाव अनेक वर्षापासून दारूच्या विळख्यात सापडले होते सदरील येथील तिन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती दारूने गावचे स्वास्थ बिघडत असून लोकांचे संसार उद्धवस्त होत आहे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा सदरील विषय लक्षात घेताच सेनगाव पोलीांनी कडक मोहीम राबवत

विक्रेत्याचे अड्डे उद्धवस्त केले आणि गाव दारू मुक्त केला;

सदर पून्हा एगदा दारू विक्रेत्यांनी डोक वर काढत अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरू केला होता गावाबाहेरील काही अंतरावर महाळ्शी ते पानकनेरगाव रस्त्यालगत असलेल्या स्वतःच्या शेतात जूना सराईत विक्रेता सुधाकर सुर्वे हा अवैध देशी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली सदर पोलिसांनी ११ वाजेच्या सूमारास दारू अड्ड्यावर छापा टाकला परंतु दारू विक्रेत्यांना पोलीस अड्यावर येत असल्याची आधीच कानगुण लागली होती त्यामुळे विक्रेत्यांना अवैध दारू लपवण्यात यश मिळाले

सदर पोलिसांची मोहीम सुरू असतानाच विक्रेताच्या मोबाईलवर कॉल आला मी माल घेऊन येतोय सेनगाव चे कर्तव्यदक्ष व चाणाक्ष असलेले पोलीस कर्मचारी राजेश जाधव यांच्या लक्षात आले आणि तिन तास दाट झाडीत दबा धरून बसले होते ३ वाजेच्या सूमारास

रिसोड वरून शेगाव ते महाळर्षी मार्गे दोन युवक एम एच ३७ झेड ४०३७ हिरो होंडा गाडीवर दोन यूवक देशी दारूचा बॉक्स घेऊन दारू अड्याच्या दिशेने जात होते समोर पोलीस असल्याचा लक्षात येतात आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला सदर पोलिसांनी पाठलाग करत सिनेस्टाईलने पकडले आणि ३५०००, होंडा ३८४० दारू असा ३८८४० रू माल हस्तगत करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या आरोपी अक्षय गूलाब लहाने, गजानन भोपाळे रा. रिसोड यांना ताब्यात घेऊन यांच्या वर गून्हा दाखल करण्यात आला दाट झाडीत बसून असलेल्या पोलिसांची मोहीम तीन ते चार तासानंतर यशस्वी झाली पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे गाव व जिल्हा स्तरातून कौतुक केले जात आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें