गोजेगाव प्रतिनिधी रमेश सांगळे
शेताला आले तलावाचे स्वरुप औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव साळणा येळी केळी हिवरखेडा पाडीॅ सावळी धार चिमेगाव भगवा अंजनवाडी रुपुर माथा बेरुळा ऊकळी ऊंडेगाव हिवरखेडा पेरजाबाद अनखळी ई सह अन्य भागात गेले आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या शेत शिवारातील पीके पाण्याखाली गेली असल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
धार येथिल शेतकरी भगवानराव रनमाळ ज्ञानेश्वर रनमाळ
नरहरी रनमाळ तुकाराम रनमाळ यांच्या शेतातील पीक सोयाबीन हळद केळी ह्या पीकांत पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप आले असल्याने त्यांची शेतं पुर्णा नदी काठी असल्याने पुर्णा नदी भरुन वाहत असल्याने शेतातील पाणी खाली निचरत नसल्याने शेतातच साठत असल्याने या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी संबंधित प्रशासनाने पीकांचे पंचनामे करावे अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून होत आहे.













