हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक,ताकतोडा,वाघजाळी,आजे गाव, हाताळा, यासह परिसरातील अनेक गावात ढगफुली सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे गावाला गत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कहाकर बुद्रुक येथील संजय भोळे यांच्या शेतातील सुमारे तीन एकर मधील हळद पीक पूर्णपणे पाण्याखाली होते यांच्यासह यांच्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे सुमारे 40 ते 50 हेक्टर वरील नदीकाठच्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशी माहिती का कर बुद्रुक येथील संजय भोणे यांनी दिली आहे
मागील गेल्या आठ दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे यामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान देखील झाले आहे दिनांक 08/08/2025 रोजी सेनगाव तालुक्यातील बोरखडी हिवरखेडा खडकी साखरा या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता अनेक नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले होते त्यामुळे सोयाबीन पिके पूर्णपणे खरडून गेले होते यासंदर्भात प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा आता वाढदिवस होऊ नये अद्यापही या शेतकऱ्याचे पंचनामे झालेले नाहीत त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने सेनगाव तालुक्यातील ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे













