प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी “संत नामदेव घुमान यात्रा” यावर्षी आपल्या अकराव्या पर्वात प्रवेश करत आहे. नानक साई फाऊंडेशनतर्फे आयोजित ही यात्रा २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील प्रमुख धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहे.
नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची यात्रा अकरावी आहे.
🔹 संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे.
🔹 सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डरवर राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव.
🔹 दिल्ली, शिमला, चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट.
🔹 रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण, पानिपत, कुरुक्षेत्र आदी ठिकाणांचा समावेश.
🔹 पंजाबच्या पर्जिया कलान गावातील मुक्काम – तेथील संस्कृती व पाहुणचार जवळून अनुभवण्याची संधी.
🌸 श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा संगम हि घुमान यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
घुमान सद्भावना यात्रा ही केवळ धार्मिक दर्शनापुरती मर्यादित यात्रा नसून भक्ती, इतिहास, कला, संस्कृती व मनोरंजन यांचा संगम घडवून आणते. परिवारासह पर्यटनासाठी योग्य अशी ही कौटुंबिक सहल दरवर्षी शेकडो भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते.
प्रत्येक टप्प्यावर पंजाब सरकार, विविध सामाजिक संस्था आणि संत मंडळींच्या वतीने यात्रेचे उत्साहाने स्वागत केले जाते. त्यामुळे यात्रेच्या दरम्यान भाविकांना पंजाबच्या मेहमाननवाजीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा थेट अनुभव मिळतो.
घुमान सद्भावना यात्रेस गुरुद्वारा लंगर साहिबचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी आणि संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचा कृपा-आशीर्वाद लाभलेला आहे. त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे ही यात्रा अधिक पवित्र व अर्थपूर्ण ठरते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सुमारे २४८ भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत. मागील दहा यात्रांमधून चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब हरियाणा राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे आणि संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडविण्यात नानक साई फाऊंडेशनला यश आले आहे.
यंदाच्या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.
भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी, तसेच पंजाबी पाहुणचाराचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी नानक साई फाऊंडेशनतर्फे आयोजित “संत नामदेव घुमान यात्रा – २०२५” मध्ये भाविकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष कवी शिवाजी कऱ्हाळे यांनी केले आहे.mo.9960280151













