शिवाजीराव घुगरे यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ.

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली :- सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील अमृतराव पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे 15 ऑगष्ट च्या निमित्ताने श्री शिवाजीराव कुंडलिकराव घुगरे मुख्याध्यापक, श्री. रमतेराम महाराज विद्यालय, कडोळी यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यान आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. शिवाजीराव पवार साहेब

(मा.शिक्षणाधिकारी)यांनी भुषविले व प्रमुख पाहू‌णे भी भैय्यासाहेब देशमुख, (मा. शि. सभापती) भास्करराव बेंगाळ साहेब (अध्यक्ष, विद्याशक्ती शि.प्र. मंडळ, कोळसा) मा.श्री.शिवाजी कऱ्हाळे पत्रकार, डिग्रस कऱ्हाळे, श्री. आंबटकर सर (अध्यक्ष. अ.पा. कॉलेज, माळ हिवरा) श्री. खिरोड सर (केंद्रप्रमुख), श्री कळासरे सर (अध्यक्ष. राजर्षी शाहू वि.

शेगाव.खोडके), विठ्ठलराव झुंगरे (शा.स.अ) सौ. अर्चनाताई देशमुख (सरपंच, पानकनेरगाव) यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रा. एम. बी. पट्टेबहादूर सर यांनी केले, तर प्रस्तावीक श्री. बी. बी. गायकवाड सर यांनी केले, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री शिवाजी घुगरे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्राचार्य भी. पी.डी. शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. चैताली भवर ने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें