April 20, 2026 10:22 am

समाजसेविका मीरा कदम यांना शिवरत्न पुरस्कार जाहिर 

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोली सामाजिक क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन असंख्य अनाथ व गरीब शेतकरी कष्टकरी लेकरांची आई म्हणून सांभाळ करणाऱ्या हिंगोली येथील सेवा सदन विद्यार्थी वस्तीग्रह संचालिका समाजसेविका

मीराताई धनराज कदम या संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात . राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,

सिंधुताई सपकाळ यांची प्रेरणा घेऊन समाजसेवेचा वसा हाती घेतला या योगदानामुळे

लातूर मिशन वृत्तपत्राचा वर्धापन दिन व लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीदिनानिमीत्त दिला जाणारा यावर्षीचा शिवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे

अशी माहिती लातूर मिशनचे संपादक भारत जाधव यांनी दिली आहे

शिवरत्न पुरस्कार सोहळा १९ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर येथे भव्य दिमाखात पार पडणार आहे. या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

मीरा कदम यांचे सर्व स्तरातुन

अभिनंदन होत आहे

तसेच त्यांनी लातूर मिशनचे संपादक भारत जाधव व पुरस्कार निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले व या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे .

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें