April 20, 2026 5:58 am

आमदार संतोष बांगर यांनी दिली जिल्हा परिषदेला शाळेला भेट

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिकशाळेतील गुणवंत विद्यार्थी बघून केले विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन.

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी डिग्रस कऱ्हाळे येथील अपघातग्रस्त कुटुंबियांना भेट दिली यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रात नामांकित असलेली डिग्रस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता बघून आमदार बांगर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक राम कदम, शाळेचे मुख्याध्यापक किशन शेळके, जगन कऱ्हाळे, ज्ञानबा माऊली कऱ्हाळे,सुभाष कऱ्हाळे,गंगाधर साखरे,मोहनराव कऱ्हाळे, रमेश कऱ्हाळे, संतोष कऱ्हाळे गंगाधर कऱ्हाळे, दीपक कऱ्हाळे, विष्णू कऱ्हाळे, अनिल शेळके, परमेश्वर कऱ्हाळे, प्रल्हाद कऱ्हाळे पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें