हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील गाडे ज्वेलर्स वर दिनांक आठ जुलै च्या रात्री दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला होता. ज्यात चोरट्याने दुकानचे शटर फोडून तीन तोळे सोने आणि 75 तोळे चांदी असा ऐवज चोरून नेऊन पोबारा केला होता ह्या घटनेने सेनगाव शहरातील व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते ह्या जबरी चोरीचा तपास लावणे सेनगाव पोलिसासमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले असता हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक मस्के यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून अतिशय गोपनीय पद्धतीने तपास करून अवघ्या काही दिवसात दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली हिंगोली जिल्हा पोलिसांच्या ह्या कोतुकास्पद कामगिरीची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संदेश देशमुख यांनी दखल घेत सेनगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री दीपक मस्के आणि त्यांच्या टीमचा सत्कार करून हिंगोली जिल्हा पोलीस दलाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सेनगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक मस्के यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून वेगाने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे अंबरनाथ येथील वीर मंगल सिंग उर्फ डान्सिंग दुधानी हल्ली मुक्काम झरी येथे छापा टाकून त्याची पत्नी लक्ष्मी कौर पंकज सिंग दुधानी व इतर साथीदारांच्या टोळीनेगुन्हा केल्याचे कबूल केले व गुन्हा उघडकीस आणून त्यातील काही साथीदार जेरबंद करून इतर ठिकाणचे विविध गुन्हे उघडकीस आणून कौतुकास्पद कामगिरी केली
सेनगाव पोलीस स्टेशनच्या पथकात पीएसआय रवी कुमार खंदारे जमादार जीवन मस्के तुळशीराम वंजारे सतीश सातव सुनील जयस्वाल रवींद्र सूर्वसे आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता
पोलिसांच्या ह्या कामगिरी निमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री संदेश देशमुख माजी नगराध्यक्ष प्रवीण महाजन देविदास कुंदर्गे नगरसेवक जगन्नाथ देशमुख नगरसेवक वैभव देशमुख नगरसेवक मंकू अण्णा सिलानंद वाकळे संकेत पठाडे सुरज विटकरे यांनी श्री मस्के यांचा सत्कार केला













