सरस्वती पूर्णा नदीला पूर बरडा पिंपरी वझर खुर्द येथील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे

हिंगोली जिल्ह्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी वझर खुर्द या गावांमध्ये काल दिनांक 21/7/ 2025 मध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे पूर्ण आणि सरस्वती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला नदीकाठच्या पूर्ण जमिनीवरील पिके हे खरडून जमीनदोस्त झाले आहे अंदाजे 100 हेक्टर वरील पिके हे जमीन दोस्त झाले आहे अशी माहिती व जर खुर्द येथील सरपंच भास्कर राघोजी चोरमारे यांनी दिली आहे

*कापडसिंगी तळणी,लोणार महामार्गावरील वाहतूक बंद 17 गावांचा संपर्क तुटला*

हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्व दूर रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय जिल्ह्यातील कापडसिंगी,वझर खुर्द, बन, बरडा, या गावांच्या शिवारामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कापडसिनगी गावाच्या शिवारामध्ये या महामार्गावर पुलाचे काम सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्ता पूर्णपणे पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे ओढ्यातील पुराच पाणी आता रस्त्यावरून वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे सतरा गावांचा संपर्क तुटलेला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें