हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव ते ताकतोडा नाकटेक मार्गे मन्नास पिंपरी पर्यंत डांबर रस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे हा रस्ता चक्क हाताने ऊळखत आहे एकीकडे सिमेंटचे दर्जेदार रस्ते होत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात जोडणाऱ्या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार समोर येत आहे सेनगाव तालुक्यातील आजेगाव ते ताकतोडा नाकटेक मार्गे मन्नास पिपरी हा रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा झाला आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व यांच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क हा रस्ता हाताने उखडल्या चे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हा प्रकार समोर आला आहे आजेगाव ते ताकतोडा नाकटेक मन्नास पिंपरी जोडनाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते त्यानुसार कामाला सुरुवात करत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने तयार केलेला हा रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे काही दिवसातच हा रस्ता हाताने उघडत आहे
*चक्क हाताने उखळून जात आहे*
या डांबरीकरण रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व नामदेव पतंगे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी हा डांबरीकरण केलेला रस्ता चक्क हाताने करून दाखवला आहे या प्रकारामुळे संबंधित रस्ता तयार करणाऱ्या गुत्तेदाराचे पितळ उघड पडला आहे अर्थात काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला असताना रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे
*प्रतिक्रिया*
*संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी*
केवळ दोन महिने झाले या डांबर रस्त्याचे काम करून, या रस्त्याचे ठेकेदार हिंगोली जिल्ह्यातील ठेकेदारने अगदी बोगस काम केले आहे.अशा प्रकारचे बोगस कामे करायचे आणि राजकीय लोकांना हाती धरून आपले पैसे उचलून घ्यायचे असे या ठेकेदाराचा काम आहे,त्यामुळे जिल्ह्यातील डांबराचे कामे अतिशय निकृष्ट व बोगस होत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा यावर काही कारवाई करत नाही, येत्या काही दिवसांमध्ये या कामाची चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर,दिनांक 12 -8 -2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलन करण्यात येईल अशा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला ..
*गजानन कावरखे क्रांतिकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष*













