संपादक कृष्णा कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील अत्यंत गरीब शंकर गोरे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक
होत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सरळ सेवा भरतीअंतर्गत 21 मे 2025 रोजी विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात शंकर गोरे यांनी यश मिळवत विद्युत सहाय्यक पदावर स्थान पटकावले आहे. पिंपळा येथील शंकर गोरे वडिलांचे छत्र नसतांना सुध्दा एका झोपडीत राहून श्री.शंकर गोरे यांनी जिद्द व शिक्षणाच्या जोरावर अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करत.यांच्या या यशाने गावाचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे.
व शंकर गोरे यांचा गावकऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी
सरपंच अनुसयाबाई पोले,उमेश पोले,माजी सरपंच श्री बालाजी लशकरे ,आमच्या गावातील लाईनमन श्री.थोरात साहेब . श्री ज्ञानेश्वर नवले, अभिमान मारकड, उद्धवराव पोले , ज्येष्ठ नागरिक श्री.भानुदासराव पोले.व आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.













