संपादक कृष्णा कऱ्हाळे TV24मराठी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके होते. त्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. पी. बी. निरपळ, प्रा. सुनिल पाटील, डॉ. सुनिल हजारे, प्रा. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. विजय कांबळे, प्रा. मधुकर लेमले, प्रा. ए. ए. अवचार, प्रा. श्याम खर्जुले, डॉ. के. एल. पुरी, प्रा. सुरज बेले, प्रा. जुनेद शेख, प्रा. एस. एस. काशिदे, प्रा. कोल्हे
तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. भिमसंदेश दिपके, श्री. रामचंद्र अंकुशकर, श्री. विठ्ठल शिंदे व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.













