April 20, 2026 1:03 am

अवैध वाळू वाहतुकीवर उपविभागीय यांच्या पथकाची कार्यवाही तीन टिप्पर जप्त

संपादक कृष्णा कऱ्हाळे TV24मराठी 

वाळू माफियांचे धाबे दणाणले; ब्रम्हवाडी परिसरात सकाळच्या सुमारास कारवाई

हिंगोली जिल्ह्यातील ब्रम्हवाडी-चिखलाकर परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने धडक कारवाई करत वाळू

माफियांना चपराक दिली आहे.

उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांदूळवाडी शिवारात तीन टिप्पर वाहनांना पकडले. सदर टिप्परमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू भरून गोणखणीतून वाहतूक केली जात होती. ही वाहने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सेनगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात मंडळ अधिकारी के. एन. पोटे, गजानन पारीसकर, गाहिनाथ दडीमे, देविदास इंगळे, ग्राम महसूल अधिकारी रवी इंगोले, प्रशांत देशमुख, संजय लोंढे, वामन राठोड, अनिल गवई, पांडुरंग फुलसावंगे, मिलिंद गरपाळ, संभाजी होनमाने, मधुकर लोणकर, हर्षवर्धन गवई, प्रदीप इंगोले आणि वाहनचालक राजू सावंत यांचा समावेश होता.

उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे

“सरकारी यंत्रणेला गृहित धरून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना यापुढे पाय रोवू देणार नाही. वाळू माफियांविरुद्ध ही केवळ सुरुवात आहे. कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे ही आमची जबाबदारी आहे. वाळू माफियांमध्ये शासनाची स्पष्ट आणि ठोस दहशत निर्माण झाली पाहिजे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला बळी न पडता आम्ही हे मोहीम राबवत आहोत, आणि ती सुरूच राहील.”

या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल प्रशासनाच्या ठाम भूमिकेचे नागरिकांतून स्वागत होत आहे. इतर भागातही अशीच कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें