April 20, 2026 7:29 pm

पर्यायी रस्ता न केल्याने शेतकऱ्यांचे वाहनधारकांचे फार मोठे नुकसान

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली तालुक्यातील नरसी ते कडती या मार्गावर पु ला चे बांधकाम काम सुरू आहे.
पण येथे या रस्त्यावर पर्यायी रस्ता न केल्यामुळे वाहनधारकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिनांक सात जुलै रोजी आषाढी एकादशी आहेत यानिमित्त नरसी नामदेव येथे लाखो भाविक दर्शनासाठी नरसी नामदेव येथे येतात. या रस्त्यावरून येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या हजारोंनी असणार आहे त्यामुळे या रस्त्यावर पर्यायी रस्ता करणे महत्त्वाचे होते पण हा पर्याई रस्ता न केल्यामुळे भाविक भक्तांची फार मोठी गैरसोय होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा फार मोठी गैरसोय होत आहे.
म्हणून करोडो रुपयाचा निधी येऊन सुद्धा पर्यायी रस्ता न केल्यामुळे वारकऱ्यांची शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें