April 20, 2026 10:13 am

आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक झाले नामदेवाचरणी नतमस्तक…(नर्सी नामदेव)

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

पंढरीच्या विठुलाप्रति अस्सीम भक्ती असणारे व विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून ओळख आहे असे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नर्सी नामदेव या ठिकाणी ता.६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक संत नामदेव महाराज यांच्या चरणी माथा टेकवून नतमस्तक झाले.

आषाढी एकादशी निमित्त रविवारी सकाळी ७ वाजता “श्री” च्या वस्त्र समाधीची महापूजा आ तान्हाजी मुटकुळे व संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.तर भाविकांच्या दर्शन रांगेतून रामेश्वर कापसे,व गोपीचंद वडवाळकर रा उमरा कापसे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.

यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, द्वारकादास सारडा,ब्रिजगोपाल तोष्णीवाल,मनोज आखरे, भिकूलाल बाहेती,सुभाष हुले,सपोनि अशोक घारगे, नारायण खेडकर,तलाठी मंजूताई हटकर,दिपक मोरे पाटील,नामदेव मोरे, माधवराव पवार, बद्री घोंगडे,कवी शिवाजी कऱ्हाळे, टेकाळे, लोडे यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापुजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूर या ठिकाणी मोठी यात्रा भरते.महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी भाविक पायी दिंडी सोहळ्यातून विठुरायाच्या दर्शनाची वारी करतात. परंतु जे भाविक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जाऊ शकले नाहीत असे सर्व वारकरी हे मोठ्या भक्तिभावाने संत नामदेवाच्या दर्शनासाठी नर्सी येथे येतात.

विठ्ठलाच्या लाडके भक्त संत नामदेवाचे दर्शन घेतल्याने भाविकांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार होत असतो.

त्यामुळे भाविक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने येत असतात.

नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासूनच मोठी गर्दी केली होती.भाविकाचे जत्थेच्या जत्थे मिळेल त्या वाहनाने नर्सी येथे दाखल झाले होते.तर काही ठिकाणाहून पायदळ दिंड्या मुखी पांडुरंग हरी नामाचा गजर करीत दाखल होत असल्याने मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरणात अगदी भक्तीमय झाले होते.

भाविकांची गर्दी कडेकोट बंदोबस्त..

आषाढी एकादशीला संत नामदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते त्याअनुषंगाने कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे सपोउपनि नागोराव जाधव, यांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना भाविक माणिक लोडे यांच्याकडून उपवासासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

नर्सी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांचे आरोग्य पथक भाविकांच्या उपचारासाठी दिवसभर मंदिर परिसरात तळ ठोकून होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें