April 21, 2026 9:52 am

हिंगोलीत इस्कॉनच्या श्री जगन्नाथ रथ शोभा यात्रेने चैतन्य ..

 प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

हिंगोलीतील संकट मोचन हनुमान मंदिर जुन्या सरकारी दवाखान्या शेजारी प्रांगणातून भगवान जगन्नाथ रथ यात्रेचा शुभारंभ इस्कॉन च्या राधा गोपीनाथ मंदिर चौपाटी मुंबईचे उच्चविद्या विभूषित प्रवक्ते व वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रूद्रनाथ प्रभुजिंच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुंबई येथील धर्मादाय सहा.आयुक्त रवींद्र धायतडक,अभय गोपालदास प्रभुजी,धर्मराज प्रभुजी,ह्यांच्या व हिंगोली परभणी आणि वाशिम जिल्ह्या शाखेतील इस्कॉन च्या प्रभूजि व माताजिं बाळगोपलाचां आणि हिंगोली जिल्ह्यातील भक्त भाविकांच्या सहभागाने झाला. इस्कॉन हिंगोली शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथ यात्रा २९ जूनला मोठ्या हर्शोल्हासात हरे कृष्णा व जय जगन्नाथ च्या जयघोषात संपन्न करण्यात आली.पर्यावरणपुरक, नैसर्गिक साहित्याचा वापर करून अश्वारूढ रथावर भगवान श्री जगन्नाथ,श्री बलभद्र,आणि सुभद्रा माता ह्यांना विधिवत स्थानापन्न करण्यात आले.इस्कॉन अर्थात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावणामृत संघाच्या विशेष पद्धतीने विधिवत पूजाअर्चा आणि महा आरती रूद्रनाथ प्रभूजी व अन्य गणमान्य प्रभुजी हिंगोली शाखेच्या भक्त भाविकांच्या आणि अन्य इस्कॉन शाखेच्या प्रभुजि माताजीच्या हस्ते हरे रामा,हरे कृष्णा, जय जगन्नाथ च्या जयघोषात संपन्न झाली.विशेष म्हणजे ध्वनिक्षेपकाचा वापर देखील पर्यावरण पूरक करण्यात येवून टाळ मृदुंगाच्या निनादात निसर्ग मानव आणि पर्यावरण ह्याची सांगड घालण्यात आली त्यामुळे इस्कॉन हिंगोली शाखेने हा एक आदर्श निर्माण केला.सदरील रथ यात्रा ही संकट मोचन हनुमान मंदिर गांधी चौक ते जवाहर रोड वरील नूतन भव्य बद्रिनारायाण मंदिर मधे परिसर प्रदक्षिणा करून पोचली, दरम्यान रथ यात्राच दर्शन घेण्यासाठी व रथ ओढण्यासाठी नागरिकांनी गर्दी करून पुष्पवृष्टी करून भावपूर्ण सहभाग नोंदवला.रथाचा दोरखंड ओढून प्रभुजि माताजी आणि बाळगोपालानी समर्पित भावनेने हरे कृष्णा”, हरे रामा” च्या जयघोषात रथयात्रेची शोभा वाढवली. रथ यत्रेच्या समारोपिय सोहळ्यात अनेक भक्तभाविकानी दर्शन घेतल्या नंतर सर्व मुर्त्या मंदिरात स्थानापन्न करण्यात येवून छप्पन भोग आणि मंत्रोच्चारात हिंगोली वाशिम आणि परभणी च्या इस्कॉन शाखांच्या विशेष सहभागाने विधी संपन्न करण्यात आला. श्रीमान रूद्रनाथ प्रभुजि ह्यांनी आपल्या प्रवचनातून श्री ल प्रभूपाद ह्यांची शिकवण अंगिकारून इस्कॉन हिंगोली शाखेने जिल्ह्यात प्रतीवर्षा नुसार ह्यावर्षी देखील भव्य दिव्य आणि पर्यावरणपूरक शिस्तबध्द आयोजन केल्या बद्दल आणि लगतच्या परभणी व वाशिम आदी जिल्ह्याच्या इस्कॉन शाखा सहभागी झाल्या बद्दल सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडेच आहे असे म्हणताच हरी बोल व हरे कृष्णाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.आपल्या प्रवचनात रूद्रनाथ प्रभुजिनी विश्वात अनेक देशात एकमेकांना संपवण्याचे वातावरण असून अश्या भयंकर विघातक परिस्थीत श्रीमद् भगवद्गीतोपदेश तत्व प्रणालीच विश्वकल्याणा व विश्वबंधुत्व कडे नेवू शकते असे म्हंटले.विज्ञान कितीही प्रगतिशील झाले असले तरी ह्यास भारतीय अध्यात्माची, गितोक्ती नुसार वागण्याची, जगण्याची आणि जगू देण्याची शिकवणच जगाला विध्वंसां पासून वाचवू शकते असे म्हंटले.ही बाब आता जगभरात समजली असून जगभरात श्री ल प्रभुपादांच्या शिकवणी सह इस्कॉन च्या कार्यप्रणालीचा भगवदगीता साराचा अंगीकार होत आहे असे म्हंटले. इस्कॉन च्या तत्व प्रणालीचा अंगीकार करून जगाला विश्वबंधुत्वाची अनुभूती हे आपल्या भारताच्या वैभवात आणि भारतीय संस्कृतीला जगभरात सर्वोच्च स्थानी विराजमान करण्यासाठी चा मूलमंत्र असल्याचं म्हंटल.इस्कॉन चे ध्येय धोरण, शिकवण, अंगिकारल्याने मानवी जीवनात जेंव्हा सकारात्मक बदल घडून येतात तेंव्हा तुमच्यासारखी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग व संत श्रेष्ठ नामदेव महाराज ह्यांच्या हिंगोली जिल्ह्याची सेवाभावी,ईश्वरभक्ती करणारी,धर्म, अध्यात्म, आणि विज्ञानाची सांगड घालणारी,फळी निर्माण होते असेही रूद्रनाथ प्रभुजी म्हणाले.हिंगोली इस्कॉन शाखेने इवल्याश्या रोपट्याच्या स्वरुपात मुहूर्तमेढ केली, अन् भविष्यात ह्याचा वटवृक्ष होत असून सर्वांना सावली देईल असा आशावाद रूद्र नाथ प्रभुजिनी व्यक्त करून इस्कॉन हिंगोली शाखेच मनोबल वाढविले.ओडिसा राज्यातील पुरीच जगन्नाथ मंदिर हे जगप्रसिद्ध असून भगवान जगन्नाथ,भगवान बलभद्र आणि माता सुभद्राच दर्शन घेण्यासाठी व रथ यात्रे साठी जग भरातील भक्त भाविक येत असतात.हे मंदिर वैष्णव परंपरेचे असून संत रामांनद ह्यांच्याशी संबंधित आहे.हे गौडिय वैष्णव संप्रदायातील अनन्य साधारण महत्वाचं आहे ह्या संप्रदायाचे संस्थापक श्री चैतन्य महा प्रभू जगन्नाथ,बलभद्रआणि सुभद्रा मातेचे परमभक्त होते आणि अनेक वर्ष ते जगन्नाथ पुरीत वास्तव्यास होते असेही ते म्हणाले. इस्काँचे संस्थापकाचार्या श्री ल प्रभुपाद ह्यांच्या शिकवणी आणि तत्व प्रणाली अंगिकारून जो भक्तीत येतो त्याचे कुटुंबीयांचे कल्याण होते अस त्यांनी म्हंटल. शेवटी छप्पन्न भोग व महाप्रसादाचा लाभ उपस्थितानी घेतला. हिंगोलीत ह्या यशस्वी अभूतपूर्व रथ यात्रा आयोजनात मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रूद्रनाथ प्रभूजि,धर्मराज प्रभुजी,अभय गोपालदास प्रभुजी,चारू गौरांगदास प्रभुजी,बद्रिनारायान मंदिराचे विनयदास महाराज, सर्व प्रभुजी, माताजी, बालगोपाल आणि इस्कॉन च्या सर्व भक्त भाविकांनी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं.ह्या वर्षी देखील भक्त भाविकांकडून विशेष करुनमहिला बालगोपाल कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें