April 21, 2026 9:09 am

शेतकर्यांचा मूलगा साहेब झाला १८ महिन्याच्या प्रशिक्षण नंतर पानकनेरगांवात वाजत गाजत गावकऱ्यांकडून सत्कार

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

जिद्द व मेहनतीच्या जोरावर अक्षयची प्रेरणादायी कहाणी मुलगा साहेब पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव या ठिकाणी महाराष्ट्र वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी पदी निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अक्षय विठ्ठलराव गायकवाड यांचा गावकऱ्यांच्या वतीने २८ जून रोजी वाजत-गाजत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट व मेहनत करीत आपल्या मुलाला शिकवित असतात. अशाच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर

आई-वडिलांचे स्वप्न मनात बाळगत आपल्या प्रतिकूल परिस्थितीची जाणिव ठेवून तेवढ्याच जिद्दीने दिवसरात्र अभ्यास केला.आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यामाध्यमातून २०२१ ला परीक्षेत उत्तीर्ण होत वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी या पदासाठी पात्र ठरला आहे. अक्षय यांनी जिद्द मेहनत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांचे स्वप्न मनात ठेवून

पहिली ते पाचवी पर्यंत दाताडा येथील मामाच्या गावी शिक्षण घेतले त्यानंतर बारावी पर्यंत वसमत येथील नवोदय विद्यालय यश मिळवत बिएससी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणारी वनसेवा परीक्षा २०२१ साली वनपरिक्षेत्र अधिकारी आरएफओ रेंज फॉरेस्ट ऑफिसर अशी पदवी मिळवली त्यानंतर हैदराबाद येथे १८महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्याच्या या उज्वल यशाबद्दल जन्मगावी पानकनेरगाव येथे २८ जून रोजी सकाळी आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने बँड लावत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा साहेब होतो तेव्हा हा अभिमान पाहून अक्षय गायकवाडच्या यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे अक्षय यांच्या यशामुळे पाणकनरगावचे नाव जिल्हाभरात तर पोहोचलेच परंतु आई-वडिलांचे स्वप्न साक्षात उतरवत कूटूबिंयांचे नावलौकिक केले केले

प्रतिक्रिया – शोभाताई विठ्ठल गायकवाड आई- वडील 

अक्षय हा लहानपणापासून अभ्यासात मग्न असायचा त्याचे मण नेहमी अभ्यासात रमायच अभ्यास करत बसला की तो पूर्ण होईपर्यंत हट्ट व जिद्द सोडायचा नसे हा मूलगा शिकून काहीतरी होईल असे वर्तन दिसत होते आपला मूलगा साहेब होऊ शकतो या अपेक्षेने आई वडील मागे हटले नाही लहानपणापासून संस्कार शिक्षणासाठी लागणारा खर्च अक्षयला कमी पडू दिला नाही अक्षयच्या शिक्षणासाठी शेतात राब राब राबत कष्ट केले एवढच नव्हे तर आईने बचत गटातून पैसे उभे करत हळद लसूण कांदा आटा व तसेच दळण्याची चक्कीचा व्यवसाय उभा केला या व्यवसायातून एक एक रुपया मिळणारा पैसा हा शिक्षणासाठी आधार बनला

अक्षय ने रात्रंदिवस अभ्यास करून संघर्षमय जीवनातून यश प्राप्त करून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आपला मुलगा साहेब झाला हे पाहून

आई -वडील चेहऱ्यावरचा आनंद मावेनासा झाला अक्षय गायकवाड यांचा आदर्श घेत जिल्ह्यातील प्रत्येक युवकांनी अधिकारी बनावे असा विश्वास गायकवाड कुटुंबीयांनी TV 24 मराठी जवळ व्यक्त केला आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें