हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या धोत्रा येथील ग्रामस्थांनी आज दि 30/06/2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप लावण्यात आले आहे
धोत्रा येथील जिल्हा परिषद शाळेत येता पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे येथे 40 विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक राहिला आहे त्यामुळे एक शिक्षकांनी पाच वर्ग कसे सांभाळणार विद्यार्थ्यांना काय शिकवणार यासंदर्भात धोतरा येथील ग्रामस्थांच्या वतीने शिक्षण विभागाला निवेदन देखील दिले होते मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप लावण्यात आले आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांच्या घेण्यात आली होती वेळो वेळी मागणी करून सुद्धा शिक्षक मिळत नाहीत त्यामुळे शालेय समिती अध्यक्ष नागनाथ तायडे नानाभाऊ थिटे रामथिटे संतोष तुकाराम ढोणे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ या आंदोलनाला उपस्थित होते
धोत्रा येथील जिल्हा परिषद शाळेत जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली होती साखरा येथील केंद्रप्रमुख जीएन पायघन यांनी मध्यस्थी करून तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षक पाठवतो असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले नंतर शाळेचे खूप उघडण्यात आले होते













