हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरदरी 33 KV येथे कार्यरत असलेले बाह्स्त्रोत यंत्रचालक नवनाथ कचरे यांची महावितरण विद्युत सहाय्यकपदी कल्याण येथे निवड झाली आहे त्या बद्दल गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे
शेतकरी अंबादास कचरे यांच्या मुलाची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सरळ सेवा भरतीअंतर्गत 21 मे 2025 रोजी विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात नवनाथ कचरे यांनी यश मिळवत विद्युत सहाय्यक पदावर स्थान पटकावले आहे. गंधारी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवनाथ कचरे यांच्या या यशाने गावाचा आणि कुटुंबाचा मान उंचावला आहे.
अत्यंत हलकीच्या परिस्थितीत समोर जात नवनाथ कचरे यांनी या यशाला गवसणी घातली आहे नवनाथ कचरे यांचे प्राथमिक शिक्षण गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाली माध्यमिक शिक्षण आश्रम शाळा गडदगव्हाण येथे झाले अकरावी बारावी लोणी येथे शिक्षण झाले आय टी आय शासकीय जिंतूर येथे झाले लहानपणापासूनच नवनाथ कचरे हे शाळेमध्ये अतिशय हुशार होते मात्र घरची परिस्थिती अतिशय बिकट होती स्वतःचे शिक्षण पूर्ण करत कुटुंबाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच होती त्यांचे वडील त्याच्या मूळ गाव गंधारी येथील हनुमान मंदिर येथे पुजाऱ्याचे काम करतात नवनाथ कचरे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घोरदडी येथील 33 k. v वरकाम करत होते 21 मे 2025 रोजी कचरे यांनी महावितरणच्या विद्युत सहायक पदासाठी परीक्षा देखील दिली होती आणि आज त्याचा निकाल लागला आणि त्यांची कल्याण येथे निवड देखील झाली आहे या निवडीबद्दल घोरदडी गावातील माजी सरपंच संजय चिलगर व घोरदडी येथील त्यांच्या मित्राच्या वतीने घोरदडी येथील ३३ केवी सबस्टेशनवर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे













