हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
सेनगाव तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे मात्र या ठिकाणी केवळ तीनच शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे तरी कसे असावा ग्रामस्थांच्या वतीने केला सध्याच्या परिस्थितीत हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत 87 मुले मुली शिक्षण घेत आहेत मात्र या विद्यार्थ्यांना शिकवण्यास करिता शिक्षकच नाहीत केवळ तीनच शिक्षक असल्यामुळे एक शिक्षक मुख्याध्यापकावर बाहेरचा लोड असतो दोन शिक्षकांनी आठ वर्ग कसे सांभाळायचे व विद्यार्थ्यांना काय शिकवायचे असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे या जिल्हा परिषद शाळेत शिकून या गावचे आयएएस अधिकारी योगेश निरगुडे झाले आहेत मात्र आज त्याच शाळेमध्ये शिक्षकांची उणीव जाणवत आहे योगेश निरगुडे आयएस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शाळा डिजिटल करण्यात व तसेच ग्रामस्थांच्या वतीने वर्गणी जमा करून शाळेची रंगरंगोटी अगदी आकर्षित देखणी अशी करण्यात आली आहे आज या जिल्हा परिषद शाळेत अनेक गरीब शेतकऱ्याची मुले शिक्षण घेतात असं जर चालू राहिलं तर एक दिवस शाळा बंद पडतील शिक्षक नसल्यामुळे गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थी काढून बाहेरगावी शिक्षणाकरिता टाकत आहेत या संदर्भात शालेय समितीच्या वतीने दिनांक 22 /09/ 2025 रोजी सेनगाव येथील शिक्षण अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले होते मात्र या निवेदनाची कोणीही दखल घेतली नाही आज पुन्हा हिवरखेडा येथील शालेय समितीच्या वतीने व गावातील ग्रामस्थांच्या वतीने हिंगोली येथील जिल्हा परिषद येथील शिक्षणाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे आत्ता जर येत्या दोन ते चार दिवसात हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक भरती नाही केली तर ही वरखेडा ग्रामस्थांच्या वतीने सीओच्या दाना विद्यार्थ्यांना घेऊन शाळा भरवण्यात येईल असा इशारा हिवरखेडा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे













