मनाठा पोलिस प्रशासनाच्या रन फॉर युनिटी एकता दौड ला चांगला प्रतिसाद 

प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार , अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील , भोकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मनाठा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा पोलिस प्रशासनाकडुन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फॉर युनिटी एकता दौड ला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी उपस्थितांना आरोग्य चांगले राहील यासह विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सकाळी आठ वाजता दोन किलोमीटर अंतर रनिंगसाठी युवक वर्ग पोलिस कर्मचारी वर्गानी सहभाग घेतला होता.यामध्ये येथील सात वर्षीय अथांग यांनी सहभाग घेत मन आकर्षित केले. यावेळी कार्यक्षेत्रातील पोलिस पाटील प्रतिष्ठित नागरिक यूवा वर्ग मनाठा पोलिस प्रशासन उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें