हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगूडे
(विस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी दिला शाळेतील आठवणीचा उजाळ)
स्नेहसंमेलनात शिक्षकांची उपस्थिती फेटे बांधून शिक्षकांचे केले स्वागत. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
हिंगोली :ते म्हणतात ना ‘एक एक कडी गुंतली की त्याची साखळी तयार होते’ अगदी तशीच एक साखळी या सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून गुंतली. स्नेहभेट घडवून आणायची संधी मिळाली ती दिवाळी सणामुळे या भेटीला आठवणींचा ओलावा मिळावा यासाठी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेतच हा स्नेहमेळावा सोहळा पार पडला. कार्यक्रमस्थळी सकाळीच सर्व नियोजना नुसार विशेष आतुरता होती ती सर्वांना त्या काळी शिकवलेल्या शिक्षकांना भेटण्याची जे आमंत्रित होते. त्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना त्या काळात गेल्याचे जणू भास व्हायला लागले होते. सोहळ्या प्रसंगीसर्व गुरुजन मंडळीचे आतुरतेने वाट पाहत होते
यावेळी तब्बल ५० माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी त्याच वर्ग खोलीत जागवल्या, जेथून सर्वजण दुरावले होते. तिथेच पुन्हा भेटून आठवणी जाग्या केल्या.
25 आक्टोबर रोजी पानकनेरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीमध्ये सन 2005 – 2006 या शैक्षणिक वर्षात शिकत असणार्या माजी शालेय विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ज्यांच्याकडून ज्ञानाचे व शिस्तीचे धडे घेतले अशा आपल्या आदरणीय शिक्षकांना फेटे बांधून गुरुजनांचे ..दुतर्फा उभे राहत…पुष्पवर्षाव करत सुहास्य वंदनाने स्वागताचे गित गाऊन टाळ्यांच्या निनादामध्ये सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी सहर्ष स्वागत केले
या स्नेहसंमेलनात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.माध्य.शाळा पानकनेरगाव येथील प्रभारी मुख्याध्यापक श्री ए.बी.गालटे सर व प्रमुख पाहुणे श्री.बी.एच. पवार सर तसेच श्री.ए.टी. जमदाडे सर, श्री.डि.एन. बोरकर सर, श्री. डी.ए. देशमुख सर, श्री.एन.बी. आरु सर, श्री.एम.एम. चौधरी सर, श्री.बी.डी. भगत सर, श्री.डी.जी. मोरे सर, श्रीमती टी.बी.गवळी मॅडम, श्री.गारडे सर व संदीप बिचवार सर इ.सर्व शिक्षक या स्नेहसंमेलनात आवर्जून उपस्थित होते.
यावेळी या बॅचमधील सर्व विद्यार्थी एकत्र झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय दिनाच्या आठवणी उजागर केल्या. तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी एकमेकांशी पुन्हा परिचय करून देऊन आपुलकीने विचारपूस करत शाळेतील गमतीदार आठवणीवर हसरी चर्चा करत हा दिवस संपू नये अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले व शाळेतील किस्से कहानियांना उजाळा दिला खरंतर लग्न पश्चात प्रपंचामध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर काही वर्षांनी मनाला थोडी उसंत मिळते आणि मन पुन्हा भूतकाळात रेंगायला लागते बालपणीचे मित्र मैत्रिणी शाळेमध्ये केलेल्या दंगा मस्ती अभ्यास व शिस्तीमध्ये शिक्षकांचा खाल्लेला मार या आठवणी माणसाच्या मनाला खरंच एक उजाळा देऊन जातात.या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या आगळ्यावेगळ्या स्नेहसंमेलनात 2005-2006 च्या बॅचमधील विद्यार्थी 95 टक्के उपस्थित होते. यामध्ये मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२० वर्षांनी भेट होत असल्याने शिक्षक व उपस्थित मित्र मैत्रिणींमध्ये उत्साह आणि आनंद ओसंडून वाहात होता जीवनातील आठवणी सांगून त्या काळातील आठवणी जागृत केल्या. माझी विद्यार्थ्यांच्या आदरातिथ्याने आनंदित झालेले उपस्थित असलेल्या गूरूजनांनी उत्कृष्ट नियोजनासाठी संयोजक समितीचे विशेष कौतुक केले शेवटी पुन्हा एकदा दरवर्षी स्नेह मेळाव्याला भेटण्याचे आव्हान करण्यात आले.स्नेह संमेलनाचे अध्यक्ष व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.गालटे सर यांनी शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मदत, सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी अशोक टापरे व शिल्पा केसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण महाजन यांनी केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.आभार मानल्यानंतर देखील सर्वजण गप्पा मारत होते. फोटो सेशन करत तिथेच रेंगाळत होते.तिथून जाण्यासाठी कोणाचाही पाय निघत नव्हता. पुन्हा स्नेह मेळाव्यात भेटण्याचा संकल्प करत सर्वांनी जण जड अंतकरणाने आठवणीने डोळ्यात अश्रू आणून एकमेकाचा निरोप घेतला.
दिवसभर गप्पा गोष्टी एकमेकांच्या हितगुजा रमल्यानंतर सोबतच भजनाचाही आस्वाद घेण्यात आला आणि कार्यक्रमाचा शेवट गोड केला सदर या पानकनेरगाव नगरीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे गावातून व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.













