April 20, 2026 10:28 am

जोडपरळीनगरीत श्री परमेश्वर महादेव मंदिर बांधकाम भूमिपूजन भक्तिभावात संपन्न !

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

जवळा बाजार येथून जवळच असलेल्या जोडपरळी येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर परमेश्वर महादेव मंदिर बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत भक्तिभावाने पार पडले. या प्रसंगी गावातील सर्वपक्षीय मान्यवर, नेते, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार ठरले.

दुपारी 2 ते 4 या वेळेत ह.भ.प. ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या कीर्तनातून परिसर भक्तिमय झाला. त्यांच्या ओजस्वी कीर्तनाने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक उर्जा लाभली.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा. गंगाधर नाना जवंजाळ (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट) आणि मा. दिनेशराव बोबडे (विधानसभा प्रमुख, शिवसेना उबाठा) यांनी दाखवली.

या धार्मिक सोहळ्यास परमपूज्य महंत मंडळींची उपस्थिती लाभली —

1. पंचानंद गिरीजी महाराज (आनंद आखाडा)

2. वैष्णव गिरी महाराज (श्री क्षेत्र दरेगव्हाण)

3. जीवन भारती महाराज (औंढा नागनाथ)

4. ऋषीपुरी महाराज (तपोवन)

5. रोशनगिरी महाराज (जुना आखाडा)

6. केशव महाराज टाकळीकर

7. अच्युत महाराज पिंगळीकर

8. रुस्तुम महाराज डिग्रसकर

9. उमेश महाराज तपोवनकर

10. भगवान महाराज मर्डसगांवकर

11. गणेश महाराज जवळेकर

12. तुकाराम महाराज पिंगळीकर

13. विश्वास महाराज मेहकर

14. त्र्यंबकराव शिंदे

15. प्रकाशराव देशमुख

16. रावसाहेब मामा खिस्ते

कार्यक्रमाचे आयोजन भागवताचार्य राजेश्वर महाराज जोडपरळीकर यांनी केले होते.

सुत्रसंचालन सोपान काळे सर यांनी उत्तमरीत्या केले तर आभार निवृत्ती महाराज पांचाळ यांनी केले.

या धार्मिक उत्सवाने जोडपरळी गावात एकता, श्रद्धा आणि भक्तीचे नवे पर्व आरंभले असून ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी मंदिर बांधकामासाठी दान केले व एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें