April 20, 2026 9:58 am

शिक्षिकेसाठी विद्यार्थी व पालकांचे सीइओना निवेदन 

प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली.मीराबाई गणगे (कदम) यांची बदली जिल्हा परिषद ,प्राथमिक शाळा अंतुलेनगर येथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाळेगाव या ठिकाणी झाली आहे. पण या बदलीमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुलेनगर या शाळेतील विद्यार्थी खूप अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. इयत्ता पाचवीतील अनेक मुले आजारी पडली आहेत आणि आमच्या टीचर येईपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही असे म्हणत आहेत. 

पालकांची प्रचंड नाराजी आहे. ज्या दिवशी मॅडमची बदली झाली त्यादिवशी विद्यार्थी धाय मोकलून रडत होते. मॅडम जाऊ नयेत म्हणून त्यांनी शाळेचे गेट बंद केले होते.

मीरा गणगे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार केले होते. विविध उपक्रम घेऊन त्या शाळेचा विकास करत होत्या. त्यांच्या विविध उपक्रमामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे.

या शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे येत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या कमी होत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुलेनगर येथे मात्र 400 च्या जवळपास विद्यार्थी आहेत. आणि यामध्ये मॅडमचा सिंहाचा वाटा आहे.इयत्ता पहिली मध्ये 18 विद्यार्थीसंख्या घेऊन सुरू केलेल्या वर्गात इयत्ता पाचवी मध्ये 71 मुले आहेत. आणि या सर्व मुलांना मॅडम एकट्याच शिकवायच्या.

नवोदय स्कॉलरशिपसाठी 29 मुले इयत्ता पाचवीची बसलेली आहेत. मॅडमच्या बदलीमुळे या सर्व मुलांचे नुकसान होते की काय अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर येथील विद्यार्थी शेतकरी शेतमजुराचे आहेत.. मॅडम त्यांना आईप्रमाणे लळा लावत होत्या. त्यांचे आजारपण आणि इतर अनेक गोष्टीत त्या मुलांवर आईप्रमाणे लक्ष देत होत्या.

मॅडमची बदली होणं ही गोष्ट पालक स्वीकारू शकत नाहीत.. त्यामुळेच त्यांनी आज दिनांक 23.09.2025रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांना निवेदन देऊन मीरा गणगे यांची बदली रद्द करावी असे निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव भवर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मनोज लिंबेकर, प्रिया मुळीक, अलका कांबळे ,दिगंबर फंदे संजय काळे, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, आणि शाळेतील सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांनी निवेदन स्वीकारताना

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें